गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फळातील रसशोषण करणाऱ्या पतंग किडीचे व्यवस्थापन
टोमॅटो आणि डाळिंबासारख्या पिकांमध्ये सध्या फळातील रसशोषण करणाऱ्या पतंगाची लागण सुरू झाली आहे. या किडीचा प्रादुर्भाव पेरू, लिंबूवर्गीय पिके, टरबूज आणि खरबूज यां पिकामध्ये, तसेच कपाशीच्या हिरव्या बोंडांमधून रस शोषण करून नुकसान करतात. फळातील रसशोषक पतंग फळबागाच्या सभोवतालच्या तणांवर अंडी देते. या किडीची अळी सभोवतालच्या तणांवर उपजीविका करत असल्याने पिकाचे नुकसान करत नाहीत परंतु याचे प्रौढ पतंग फळातील रसशोषण करतात. पतंग संध्याकाळच्या वेळी सक्रिय असतात. रसशोषण्यासाठी योग्य फळाचा भाग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे पतंग फळामध्ये छिद्र (पंक्चर) करतात. शेवटी मजबूत असा तोंडाचा भाग फळामध्ये घालून रस शोषण करतात. या छिद्रांमधून बुरशी आणि जीवाणू प्रवेश करतात त्यामुळे बुरशीची लागण होऊन फळ सडते. पतंगांमुळे होणारे नुकसान फळांवरील पिन-होल पंक्चरमुळे सहज ओळखता येते.
• पुढील होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गळ झालेली खराब फळे गोळा करून नष्ट करावी. • संध्याकाळी ते मध्यरात्री बॅटरी (टॉर्च) व कीटक-जाळ्यांच्या मदतीने प्रौढ पतंग गोळा करून आणि नष्ट केल्यास प्रभावी नियंत्रण होवू शकते. परंतु हि क्रिया सतत करणे आवश्यक आहे. • बागांच्या सभोवतालचे तण नष्ट करावे कारण, कारण त्यांच्यावर अळी उपजीविका करते. • रात्रीच्या वेळी किडी सक्रीय होत असल्याने बागांमध्ये रात्री धूर करावा. • शक्य असल्यास प्रकाश सापळे बसवावेत. • हे पतंग टोमॅटोच्या पिकांकडे आकर्षित होत असल्याने नियमित निरीक्षण करून टोमॅटो पिकाची तपासणी करावी. • छोट्या फळबागामध्ये, या पतंगांमुळे होणारे नुकसान व्यवस्थापित करण्यासाठी तपकिरी प्लास्टिकची पिशवी (५०० गेज) किंवा फळांभोवती कागदाच्या पिशव्या लपेटल्या जाऊ शकतात. • विष अमिषाची फवारणी फार प्रभावी ठरते. तयार करण्यासाठी, २ लिटर पाण्यामध्ये आणि २०० ग्रॅम गूळ विरघळून त्यामध्ये व्हिनेगर किंवा फळांचा कोणताही रस १२ मिली आणि मॅलाथिऑन ५० ईसी २० मिली टाकून चांगले मिश्रण करावे. हे मिश्रण लाकडी काडीने चांगले ढवळावे. हे द्रावण सुमारे ५०० मिली खुल्या प्लास्टिकच्या भांड्यात घेऊन प्रति १० झाडांजवळ ठेवावे. यामुळे पतंग त्याकडे आकर्षित होतात, किडींनी हे द्रावण शोषण केल्याने ते मरतात. अशा प्रकारे या पतंगांची संख्या कमी होऊ शकते. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
104
0
संबंधित लेख