गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय पिकामधील फळमाशीचे एकात्मिक व्यवस्थापन
वेलवर्गीय पिकांमध्ये फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे जास्त नुकसान होते. काकडी, भोपळा, कारले, दोडका, कलिंगड यासारखी फळे स्पंजसारखे मऊ व दबलेली होतात. फळांचा रंग तपकिरी होतो. फळमाशी ही फळामधील आतील भाग खाऊन टाकते तसेच फळामध्ये अंडी घालते. प्रादुर्भावग्रस्त फळे ही गळून पडतात. फळ माशीचा प्रादुर्भाव हा मार्च, एप्रिल या हंगामात जास्त होतो.
व्यवस्थापन –_x000D_ • फळमाशीचे अंडी किंवा कोष नष्ट करण्यासाठी खोलगट नांगरणी करावी._x000D_ • प्रादुर्भावग्रस्त फळे जमिनीमध्ये गाडून टाकावीत._x000D_ • फळांची वेळोवेळी काढणी करावी._x000D_ • प्रति हेक्टरी क्युर लूर १६ सापळे स्थापित करावेत._x000D_ • रासायानिक कीटकनाशकच्या मदतीने फळमाशी पूर्णपणे नियंत्रणात येत नाही._x000D_ • फळमाशीला आकर्षित करण्यासाठी आमिष दाखवावेत._x000D_ _x000D_ विषारी आमिष तयार करण्यासाठी –_x000D_ ५०० ग्रॅम गुळ अधिक १० लिटर पाण्यात मिसळून रात्रभर ठेवावे. त्याचबरोबर अधिक ४० लिटर पाणी मिसळून त्यामध्ये अधिक क्विनॉलफॉस २५ ईसी ५० मिली एकत्रित मिसळून या द्रावणची शेतीमध्ये फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
149
0
संबंधित लेख