AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Mar 20, 01:00 PM
कृषी वार्ताअॅग्रोवन
मध निर्यातीत मोठी वाढ
भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला देशांतर्गत व विदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. २०१८-१९ मध्ये मध उत्पादन १ लाख २० हजार टन झाली असून, निर्यात ६१ हजार ३३३ टन झाली होती. गेल्या पाच वर्षात उत्पादनात ५७.५८ टक्के वाढ झाली असून, निर्यात ११६.१३ टक्क्यांनी वाढल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
चालू वर्षी भारतातून ६१ हजार ३३३ टन निर्यात झाली असून, यातून भारतातला ७३२ कोटी १६ लाख परकीय चलन भारताला मिळाले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये हा व्यवसायात मोठया प्रमाणात वाढ होत आहे. मधाचा उपयोग औषधनिर्मिती, खाण्यासाठी तसेच खादयदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याने बाहेर देशातूनदेखील मोठया प्रमाणात या मधाला मागणी आहे. संदर्भ – अ‍ॅग्रोवन, 20 मार्च 2020 ही महत्वपूर्ण माहिती लाइक करा व आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा
40
1