AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Aug 19, 06:00 PM
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात अल्प व मध्यम स्वरूपाचा पाऊस
महाराष्ट्रात राज्यात १७ ते २१ ऑगस्टपर्यंत हवेचे दाब वाढतील. हे हवेचे दाब वाढल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हयात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या आठवडयात अपेक्षित आहे. राज्यावर १००४ हेप्टापास्कल इतका सध्या हवेचा दाब असून, तो १९ ऑगस्टला १००६ हेप्टापास्कलपर्यंत वाढत आहे. यानंतर तो कायम आठवडाभर राहणे शक्य असल्याने या आठवडयात ढगाळ हवामान व काही तुरळक ठिकाणी अल्पशा: पावसाची शक्यता राहील. सकाळी व दुपारची आर्द्रता अधिक राहिल्यामुळे हवामान थंड राहील. कृषी सल्ला १. उभ्या पिकातील मोठी तणे उपटून काढून ते नष्ट करावे. २. डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, रोगाचा प्रसार होऊ नये त्यासाठी स्ट्रेप्टोमायसीन ५ ग्रॅंम व १० लि. पाण्यातून फवारणी करावी. ३. कोरडवाहू भागात रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी मोठया आकाराच्या शेतीमध्ये बंदिस्त वाफे तयार करावेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाफ्यात मुरेल व पेरणीच्या वेळी शेतीमध्ये पुरेसा ओलावा राहील. संदर्भ – डॉ. जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
79
0