AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Mar 20, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
पाहा, किसान प्रगती कार्डचे फायदे
केंद्र व राज्य सरकारने कृषी संबंधित गरजा भागविण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत किमान व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज देतात. आता यानंतर, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किसान प्रगती कार्ड सुरू केले आहे. किसान प्रगती कार्ड पीक उत्पादन, देशाच्या पीकपूर्व व पिकानंतरची आवश्यकता, कृषी भांडवल आणि शेतीच्या मालमत्तेच्या देखभालीसाठीचा विचार करता हे कार्ड सुरू करण्यात आले आहे. या कार्डचा उपयोग वैयक्तिक अपघात विमा योजना (पीएआयएस) देखील करता येणार आहे.
किसान प्रगती कार्डचे फायदे १. किसान प्रगती कार्ड वार्षिक नूतनीकरण पर्यायासह 5 वर्षासाठी 10 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट मर्यादा देणार. २. 1 ते 5 वर्षाच्या कालावधीत 10 लाख रूपयांपर्यंत लोन मिळेल. ३. 3 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य शुल्क आकारले जाईल. ४. कर्जाच्या पर्यायांतर्गत उज्ज्वन स्मॉल फायनान्स बँक शेतकऱ्यांना विविध गरजा पूर्ण करण्यासाठी किसान उन्नाव इमरजेंसी लॉयल्टी देखील देईल. किसान प्रगती कार्ड म्हणजे काय? उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय काओ म्हणाले की, "आजही जिथे बहुतांश लोकांचे उत्पन्न किंवा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे, तिथपर्यंत कर्ज पोहचविणे हे शेतीला खूप महत्वपूर्ण बनविते. याव्यतिरिक्त शेतकरी, विशेषत: लहान आणि सीमांत लोक संस्थात्मक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे ते स्थानिक सावकारांकडे जाण्यास त्यांना भाग बनते, जे खूप जास्त व्याज दर आकारतात. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक किसान प्रगती कार्डाच्या माध्यमातून आकर्षक व्याज दरावर, शेतकऱ्यांना शेतीविषयक कामांसाठी किसान प्रगती कार्डवर कर्ज देईल. संदर्भ – कृषी जागरण, ७ मार्च २०२० हे महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकऱ्यांसोबत शेअर करा
1611
62