पशुपालनNDDB
पशुधन कॅलेंडर: ऑक्टोबरमध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
• पाय व तोंड (लाळ खुरकत) हा रोग झाल्यास, जनावरांच्या बाधित भागावर लाल औषधाने (पोटॅशियम परमॅंगनेट) १ टक्के द्रावणाने उपचार करावा. • अद्यापही आपण जनावरांना लाळ खुरकत रोग, रक्तस्त्राव, फऱ्या, एंटरोटॉक्सिमिया इत्यादींचे लसीकरण केले नसल्यास, कृपया वेळेत करून घ्यावे. • परजीवी व जंतूनाशक/द्रावण देण्यासाठी ही योग्य वेळ आहे. • परजीवी जंतूनाशकांचा वापर करावा.
• जनावरांना वेळोवेळी खनिज मिश्रण द्यावे. • या महिन्यात हिरव्या गवताची उपलब्धता वाढते, परंतु त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. कोरडा आणि हिरवा चारा एकत्र मिसळून द्यावा. जास्त हिरवा चारा दिल्यास अतिसार किंवा चयापचयाची समस्या उद्भवते. • जर आपण मागील महिन्यात मेंढरांची लोकर कातरली नसल्यास, तर या महिन्यात कात्रावी. • मेंढीच्या शरीरावरील केस काढून टाकल्यानंतर २१ दिवसांनी, बाह्य परजीवी टाळण्यासाठी जंतुनाशक द्रावणाने स्नान घालावे. • या महिन्यात थंडीचा हंगाम सुरू होईल, त्यामुळे जनावरांचे थंडीपासून संरक्षणासाठी योग्य व्यवस्थापन करावे. संदर्भ : एनडीडीबी जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
198
0
संबंधित लेख