मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
राज्यात काही भागात पावसाचे प्रमाण हलक्या ते मध्यम स्वरूपाचे राहील. कोकण, विदर्भ व मध्य भागात आठवडाभर विस्तृत स्वरूपात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या आठवडयाच्या सुरूवातीस 2 ते 3 दिवस अशी स्थिती राहील. त्यानंतर उत्तरेकडील महाराष्ट्राच्या भागात पावसाचा जोर राहील. 7 सप्टेबरनंतर अथवा त्या दरम्यान मध्य, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयात पावसाचा जोर कमी राहील. 12 ते 14 सप्टेंबर या काळात मुंबई, नंदूरबार, नाशिक, धुळे, जळगाव व विदर्भातील काही जिल्हयात पावसाचे प्रमाण अधिक राहील. त्याचवेळी मराठवाडयातही तुरळक ठिकाणी पाऊस होईल,
कृषी सल्ला- 1. ज्याठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, तेथे करडई व रब्बी ज्वारीच्या पेरण्या करणे हिताचे आहे. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. 2. महापूराने नुकसान झालेल्या शेतीतील पूर्वीच्या पिकाचे अवशेष काढावे. रान स्वच्छ करावे व रब्बी हंगामात पिकासाठी पुर्व मशागतीची कामे करून रब्बी पिकाची पेरणीची तयारी करावी. 3. खरीपात पाऊस न झालेल्या भागात फळबागा वाळल्या असतील, तर त्या झाडांचे अवशेष काढून घ्यावेत. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
50
0
संबंधित लेख