मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस
महाराष्ट्राच्या मध्यावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता असून कोकणात प्रतिदिनी ४५ ते ६५ मिमी, उत्तर महाराष्ट्रात १२ ते २५ मिमी, मराठवाडयात ५ ते १२ मिमी, विदर्भात ३ ते ५ मिमी व पश्चिम महाराष्ट्रात १५ ते ३४ मिमी पावसाची शक्यता आहे. राज्याच्या पूर्व भागात विशेषत: पुर्व, मध्यम व पश्चिम विदर्भ आणि उत्तरेकडील भागात ३ ते ५ जुलै दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या आठवडयात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. तो कोकणात ताशी १२ ते १५ किमी, उत्तर महाराष्ट्रात १७ ते २५ किमी, मराठवाडयात १९ ते २३ किमी, पश्चिम महाराष्ट्रात १७ ते २५ किमी, मराठवाडयात १९ ते २३ किमी, पश्चिम महाराष्ट्रात १४ ते २२ किमी या भागात हलका व मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी राहिल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. कृषी सल्ला १. ज्या ठिकाणी जमिनीत ओलावा ६५ मिमीपेक्षा अधिक असेल तेथे पावसानंतर जमिनीस वापसा येताच मूग, मटकी, उडीद, चवळी, बाजरी, तूर, रूंद वरंबा व सरीवर सोयाबीन पेरणी करावी. २. पाऊस अधिक झाल्यास शेतीतील पाणी बाहेर जावे म्हणून उताराकडील बांधाची उंची कमी ठेवावी. ३. भुईमूग, सूर्यफूल या पिकांच्या पेरण्या उरकून घ्याव्यात. ४. विदर्भात जमिनीत चांगला ओलावा झाल्यानंतर कापूस लागवड करावी व त्यात उडिद, ज्वारी ही आंतरपीक पध्दत अवलंबावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
66
0
संबंधित लेख