AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Jan 20, 03:00 PM
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पांढऱ्या माशीचे जीवनचक्र
आर्थिक महत्व:- पांढरी माशी विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान करते. पिले आणि प्रौढ पिकातून रसशोषण करतात. हे विषाणूजन्य रोगाचे वाहक आहेत. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ५०% पर्यंत नुकसान होते. जीवन चक्र अंडी:- मादी कीड पिकामध्ये खालच्या पानांच्या मागील पृष्ठभागावर मध्यम शिरालगत रांगेत अंडी देतात. मादी कीड पूर्ण जीवन कालावधीत ५१-१०० अंडी देतात. अंडी ७ ते १४ दिवसांत उबवतात. पिले:- पिले पानांचा रसशोषूण पिकाचे नुकसान करतात. पिले त्यांच्या स्थितीत ३ वेळा त्वचा सोडतात. कोषावस्था: - पिले पूर्ण विकसित झाल्यानंतर ते हिवाळ्यातील ३१ दिवसात आणि उन्हाळ्यात ११ दिवसांत कोषावस्थेत बदलतात. कोषावस्था ७ दिवसांची असते. प्रौढ/पतंग:- पतंग कोषावस्थेपासून काही काळानंतर तयार होतात आणि मादी दोन दिवसांनी अंडी घालण्यास सुरवात करते. या पतंगाचा कालावधी ३० दिवसांचा असतो. वर्षभरात बर्याच पिढ्या होतात. नियंत्रण:- पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी @६६० मिली:७५० लिटर पाण्यात किंवा डायनोटेफ्युरॉन २०% एसजी @१२५-१५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. टीप:- औषधांचे प्रमाण वेगवेगळ्या पिकांनुसार बदलते. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
103
13