किडींचे जीवनचक्रकोपर्ट बायोलॉजिकल सिस्टम
टोमॅटो पिकावरील टूटा अॅबसोल्यूटा किडीचे जीवनचक्र
• जगात टोमॅटो उत्पादक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणून हि कीड उदयास आली आहे. या किडीमुळे पिकाच्या उत्पादनात आणि फळांच्या गुणवत्तेत ५० ते १०० टक्के नुकसान होतो. • या किडीच्या उपजीविकेची मुख्य पिके म्हणजे बटाटे, वांगी आणि कडधान्य वर्गीय पिके. या पिकांमधुन हि कीड टोमॅटोमध्ये पसरते. • अंडी - अंडी लंबवर्तुळ असतात आणि त्यांचा रंग पांढरा ते तेजस्वी पिवळा असतो, जो कोषावस्थेत काळा होतो. • अळी - पहिल्या टप्प्यात अळी पांढऱ्या रंगाची असून ती पाने किंवा पिकलेली फळे खाते. दुसर्या ते चौथ्या टप्प्यात ती हिरवी किंवा फिकट गुलाबी रंगाची होते. सहसा या किडीच्या चार अवस्था असतात. • कोषावस्था - हा किडा प्रथम हिरवा, नंतर तपकिरी आणि गडद तपकिरी रंगाचा दिसतो. • प्रौढ़ - पतंग साधारणतः १० मिमी लांबी व गडद तपकिरी रंगाचे असतात._x000D_
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा!_x000D_
35
0
संबंधित लेख