किडींचे जीवनचक्रIASZoology.com
ऊस पिकातील पायरीला किडीचे जीवनचक्र!
उसाच्या पानातील रस शोषून घेणाऱ्या किडीमध्ये फार नुकसान करणारी कीड आहे. हि कीड जून ते ऑगस्ट या महिन्यात जास्त कार्यप्रवण असते, ह्या किडीची मादी वाळलेल्या गवताच्या रंगाची असून उसाच्या पानाखाली बेचक्यात ६०० ते ८०० अंडी घालते. एका पुंजक्यात ४० ते ५० अंडी असतात. अंड्यावर पांढर कापसासारखे आवरण असून ते फुंकर मारल्यावर निघून जाते व सहज दिसून येतात. या किडीची अंडी अवस्था ६ ते १२ दिवसांची असते. बाल्यावस्था ३५ ते ७५ दिवसांची असते. साधारण जीवनक्रम ४५ ते ९० दिवसांपर्यंतचा असतो.पिल्ले राखट पांढऱ्या रंगाची असून मागे शेपटीसारखे दोन तुरे असतात. पायरीला किडीची बाल्यावस्था व पूणर वाढलेले कीटक उसातील पानाचा रस सोंडेने शोषून घेतात. त्यामुळे उसाच्या पानांचा हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात. तसेच हि कीड पानावर एक प्रकारचा चिकट व गोड पदार्थ सोडते. त्यामुळे त्यावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पानावर काजळी पडल्यासारखा रंग चढून उसाच्या कर्बग्रण क्रियेत व्यत्यय येतो आणि उसाची पाने वाळू लागतात. उसातील साखरेचे प्रमाण घटते. तसेच असे दूषित उसाचे बेणे वापरले तर उसाच्या उगवणीवरही अनिष्ठ परिणाम होतो. या किडीस मध्यम तापमान व जास्त आर्द्रता फार पोषक असते. जास्त तापमानात लहान पिल्ले जास्त काळ जगू शकत नाहीत. व्यवस्थापन:- 1) प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा. 2) इपिरीकॅनिया मेल्यानोलूका या परोपजीवी किडीचे १००० कोष किंवा १ लाख अंडी प्रति हेक्टरी सोडल्यास पायरिलाचे चांगले नियंत्रण होते. *रासायनिक नियंत्रण:- 3) क्लोरोपायरीफॉस २०% @३० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६% @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 4) गरज भासल्यास १० ते १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
संदर्भ:- IASZoology.com आणि अ‍ॅग्रोस्टार हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
1
संबंधित लेख