AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Dec 19, 03:00 PM
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील घाटे अळीचे जीवनचक्र
हरभरा सामान्यत: चणा किंवा बंगाली हरभरा म्हणून ओळखले जाणारे भारतातील सर्वात महत्वाचे द्विदलवर्गीय पीक आहे. हे मानवी वापरासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी देखील वापरले जाते, धान्य, ताजी हिरवी पाने भाजी म्हणून वापरली जातात, तसेच कोंबड्या व गुरांसाठी एक उत्कृष्ट चारा आहे. हरभरा घाटे अळी हा एक बहुपेशीय कीटक आहे, जो हरभरा, वाल, करडई, मिरची, भुईमूग, तंबाखू, कापूस या पिकांवर प्रादुर्भाव होतो. नुकसानीची लक्षणे:- नोव्हेंबर ते मार्च या काळात ही कीड हरभरा पिकाचे नुकसान करते. सुरुवातीला, ते कोवळी/मऊ पाने आणि डहाळे खाते, नंतर घाट्यांना छिद्र करून अर्धे आत तर अर्धे बाहेर दिसते. त्यामुळे घाट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडीमुळे पिकाचे साधारणतः ५० ते ६०% नुकसान होते. अंडी:- अळी किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसांत अळी बाहेर पडते. अळी:- ही अळी प्रथम कोवळ्या पानांवर उपजीविका करतात. या अळीला पूर्ण विकसित होण्यासाठी २०- २५ दिवस लागतात. अळीचा रंग फिकट हिरवा चमकदार असून त्यावर पिवळ्या रंगाच्या रेषा दिसतात. कोष:- अळी कोषावस्थामध्ये जाण्यापूर्वी मातीमध्ये ८ ते १२ सेंटीमीटर खोलवर जाऊन कोषावस्थेत जाते. याचा आकार १६ मि.मि असून, तांबूस तपकिरी असून मागे निमुळता आकार असतो. पतंग:- प्रौढ किडीचा रंग हलका तपकिरी असून बदामी रंगाचे केस असतात.
नियंत्रण:- - घाटे अळीच्या नियंत्रणासाठी भिन्न प्रकारच्या मित्र अंडी परजीवी- चेलोनस ब्लॅकवर्णी इ. चा वापर करावा. - प्रोफेनोफॉस ५० ईसी @२ मिली प्रति लिटर, इंडोक्साकार्ब १४.५% एससी @०.५ मिली किंवा स्पिनोसॅड ४५% एससी @०.१ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी @२.५ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर, फोटोखाली दिलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा
118
1