AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Feb 20, 03:00 PM
किडींचे जीवनचक्रतमिलनाडु अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी
लेमन बटरफ्लाय (लिंबू फुलपाखरू) चे जीवन चक्र
लिंबू फुलपाखरू एक गंभीर कीटक आहे ज्यामुळे लिंबूवर्गीय कुळातील बागायती पिकाचे नुकसान करते. अळी हलक्या रंगाची असून पिकातील पाने खाऊन नुकसान करते. या किडीचा प्रादुर्भाव सर्व पिकांमध्ये दिसून येतो. ओळख:- 1. अंडी: अंड्याचे आयुष्य २-३ दिवसांचे असते, यांचा रंग पिवळा किंवा मलईदार असतो, मादी फुलपाखरू बहुतेक खालच्या पानांच्या पृष्ठभागावर आणि कोवळ्या फांद्या/ फुटव्यांवर अंडी देतात. 2. अळी: अळीचे आयुष्य ८-९ दिवसांचे असून, हि कीड तिच्या अळी अवस्थेत ४ वेळा त्वचा सोडते. 3. कोषावस्था:- अळीअवस्थाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, ती १०-१२ दिवस कोषावस्थेत जाते. 4. प्रौढ/पतंग: प्रौढ किडीचा कालावधी एक आठवडा असतो; ते गडद तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळ्या रंगाच्या अनेक खुणा असतात. नियंत्रण:- • अळ्या हाताने उचलून नष्ट कराव्यात. • ट्रायकोग्रामा इव्हॅनेसन्स आणि टेलीनोमस हे किडींच्या अंड्यावर उपजीविका करतो. तर ब्राकिमेरिया आणि टेरोलॉस हे अळीवर उपजीविका करतात त्यामुळे यांचा वापर केल्यास किडीचे नियंत्रण होण्यास मदत होते.
संदर्भ:- तेलंगाना अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
32
1