AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Sep 19, 06:30 PM
जैविक शेतीअॅग्रोवन
बिव्हेरिया बॅसियाना (Baeuveria bassiana)
बिव्हेरिया बॅसियाना ही बुरशी जगाच्या बहुतेक भागात नैसर्गिकरित्या आढळते. या बुरशीचे बीजाणू कीटकांच्या त्वचेच्या संपर्कात येताच, ते रुजून अंकुरित होतात. ते कीटकांच्या शरीरात वाढ करून संपूर्ण शरीरावर बुरशी पसरून अंतर्गत पोषक घटकावर जगते. ४८ ते ७२ तासात तो कीटक मरतो.
पिके: अन्नधान्य, डाळी, भाजीपाला, फळपिके इत्यादी. लक्ष्य कीटक- विविध पिकांवरील अळ्या, तुडतुडे, भुंगेरे, पाने खाणारी अळी इत्यादी. वापर: हुमणीची अळ्यासाठी माती किंवा पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. ठिबक सिंचनद्वारे पीके लागवडीपूर्वी किंवा नंतर मातीत मिसळून द्यावे. वापरण्याची पद्धत: याचा वापर किडींची संख्या किंवा पीक यावर अवलंबून असते. ग्रीन हाउसमधील पिकांवरील कीटकाच्या नियंत्रणासाठी प्रत्येकी १५ ते २० दिवसातून एकदा वापरावे. मात्रा: २०० लिटर पाण्यात २ किलो प्रति एकरी ठिबकद्वारे द्यावे किंवा ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी. संदर्भ – अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
182
0