सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला पिकांची निरोगी रोपे कशी तयार करावी?
- भाजीपाला पिकांमध्ये दर्जेदार व निरोगी रोपांच्या निर्मितीसाठी व उत्पादन वाढीसाठी योग्य रोपवाटिका तयार करणे गरजेचे आहे. - ज्या ठिकाणी आपल्याला शेडनेट तसेच कोकोपीट, प्लास्टिक ट्रे उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी शेतामध्ये योग्य जागा निवडून गादी वाफे तयार करावे. - जागा निवडताना उंच वाढलेल्या झाडाच्या खाली अथवा बांधाच्या कडेला किंवा एकदम पाणथळ जागा नसेल याची काळजी घ्यावी.
- बियाणे टाकल्या नंतर झाऱ्याच्या अथवा पंपाच्या साहाय्याने गादीवाफ्यावर पाणी_x000D_ द्यावे. मोकाट पाणी गादी वाफ्यावर सोडू नये अन्यथा बियाणे पाण्या बरोबर वाहून_x000D_ जाण्याची शक्यता असते. त्यानंतर त्यावर दोन दिवस सुतुळीचे पोते ओले करून_x000D_ टाकावे व त्यावरच पंपाच्या साहाय्याने पाणी शिंपडावे. पोते टाकल्यामुळे दमट_x000D_ वातावरण तयार होऊन बियाणे लवकर उगवण्यास मदत होईल._x000D_ - पिकानुसार उदा. मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी यांसारख्या पिकांचे_x000D_ बियाणे ८ ते १० दिवसांत बियाणे उगवून येते._x000D_ - बियाणे उगवल्यानंतर सुरुवातीला काही कीड रोग यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी_x000D_ एक आठवड्यात त्यावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम/लिटर अथवा मॅंकोझेब २ ग्रॅम/लिटर_x000D_ अथवा कॉपर ऑक्सि क्लोराईड २ ग्रॅम/लिटर यांसारखे बुरशीनाशक व_x000D_ थायोमीथोक्साम ०.२५ ग्रॅम/लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड ०.२५ ग्रॅम/लिटर_x000D_ यांसारख्या कीटकनाशकाची फवारणी करावी._x000D_ - त्याचबरोबर रोपांची जोमदार वाढीसाठी व जैविक व अजैविक ताण याविरुद्ध_x000D_ प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी सिलिकॉन १ मिली/लिटर तसेच सशक्त रोप_x000D_ बनण्यासाठी चिलेटेड कॅशिअम @ १० ग्रॅम प्रति पंप घेऊन फवारणी करावी._x000D_ _x000D_ - पुनर्लागवडीसाठी योग्य वयाची रोपे निवडावी जसे की मिरची ३५ दिवस, टोमॅटो_x000D_ २५ दिवस, काकडी/कलिंगड १८ दिवस._x000D_ कोणत्याही पिकाची चांगली वाढ, उत्पादन आणि सशक्तपणा असण्यासाठी चांगल्या_x000D_ प्रतीची रोपे निवडणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे वरील गोष्टींचा बारकाईने विचार आणि_x000D_ अंतर्भाव करणे फायदेशीर होईल._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
164
0
संबंधित लेख