AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Feb 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्यात देशातील पहिले सेंद्रिय शेती कृषी विज्ञान केंद्र
कोल्हापूर : देशातील पहिल्या सेंद्रिय शेतीवर संशोधन आणि विस्तार करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राची सुरूवात कणेरी येथील सिद्धगिरी मठावर करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातनू सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर स्वरूपात सेंद्रिय शेतीवर संशोधन करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे संघटन करण्याचे काम केंद्राने सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वीच हे केंद्र मंजूर झाले होते. आता प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली आहे. केंद्राकडे सध्या ६५ एकरांची जमीन आहे. या जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने पिके घेऊन प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. या प्रात्यक्षिकांच्या द्वारे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या बाबतीत
नवी माहिती दिली जाईल. सध्या मठाच्या वतीने लखपती शेती हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे. याला आणखी तांत्रिक पद्धतीची जोड देऊन असे प्रयोग अनेक ठिकाणी व्हावेत, अशा योजना आखण्यात येणार आहेत. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन कणेरी मठावर या नवीन केंद्रास मान्यता देण्यात आली. या केंद्रांतर्गत करवीर, कागल, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांसाठी खास करून काम करण्यात येणार आहे. या तालुक्‍यात सेंद्रिय चळवळ वाढविण्याचे काम या केंद्रामार्फत करण्यात येईल. संदर्भ – अॅग्रोवन, ७ फ्रेबुवारी २०१९
70
0