कृषि वार्ताकृषी जागरण
देशात खरीप पेरणी ४१३ लाख हेक्टरवर
नवी दिल्ली: मागील आठवडयात देशभरात अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रखडलेल्या खरीप पेरणीला वेग आला असून, आतापर्यंत ४१३ लाख हेक्टर पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पेरणी ९ टक्क्यांनी घसरली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली आहे. देशात मान्सूनच्या सुरूवातीला पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, मागील आठवडयात वायव्य, पूर्व, ईशान्य व मध्य भारतात चांगला पाऊस झाला असल्याने पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत ४१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
देशात भात पेरणी ९८ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी ११० लाख हेक्टरवर भात होता. मागील वर्षी ऊस लागवड याच काळात ५२ टक्के झाली होती. यंदा सध्या ५० लाख हेक्टरवर झाली आहे. मात्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशमध्ये चांगला पाऊस झाल्याने ३४ लाख हेक्टरवर कडधान्य पेरणी झाली आहे. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के कमी कडधान्य पेरणी झाली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १४ जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
29
0
संबंधित लेख