AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Apr 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वाग्यांमध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
• वांग्यामध्ये सर्वात जास्त नुकसानकारक कीड शेंडे व फळ पोखरणारी अळी आहे. ही अळी शेंड्या व कोवळी पाने पोखरत असल्यामुळे पाने व फुले गळतात. • एक अळी ४ ते ६ फळे नष्ट करू शकते. • पोखरलेल्या वांग्याच्या फळाबाहेर अळीची विष्ठा राहत असल्यामुळे हे वांगे खाण्याकरिता किंवा बाजारपेठेसाठी योग्य राहत नाही.
एकात्मिक कीड व्यवस्थापन:_x000D_ _x000D_ • शेतीमध्ये एकाच वांग्याचा खोडवा किंवा सतत वांग्याचे एकच पीक घेणे टाळावे. जूनच्या चौथ्या आठवड्यात पुर्नलागवड करावी. दर आठवड्याला अळीने पोखरलेले शेंडे गोळा करून नष्ट करावेत._x000D_ • एकरी १०-१५ वोटा सापळे स्थापित करावे._x000D_ • प्राथमिक अवस्थेत जैविक कीटकनाशकचा वापर करावा._x000D_ • गोमूत्र @२०%, निमार्क, सीताफळाच्या पानांचा अर्क, घाणेरीच्या पानांचा अर्क @१०% याची फवारणी घ्यावी._x000D_ _x000D_ रासायनिक नियंत्रण:_x000D_ _x000D_ • क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एस सी @४ मिली किंवा थायोक्लोप्रीड २१.७ एस सी @ १० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू जी @४ ग्रॅम किंवा थायोडीकर्ब ७५ डब्लू पी @१० ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ इसी@५ मिली किंवा सायपरमेथ्रीन ३% + क्विनोलफॉस २०% इसी @ ५ मिली फवारणी करावी. _x000D_ • प्रत्येक फवारणीच्या वेळी कीटकनाशक बदलावे._x000D_ डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
663
61