गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जिरेमधील एकात्मिक कीड व्यवस्थापन
जिरा या पिकाची लागवड गुजरात व्यतिरिक्त राजस्थान व इतर राज्यांमध्ये मोठया प्रमाणात होत आहे. या पिकाच्या फूलधारणेच्या प्राथमिक अवस्थेत मावा किडीचा प्रादुर्भाव होतो, तसेच फुलकिड हा कीटक अनुकूल वातावरण असल्यामुळे गंभीर ठरत आहे त्याचबरोबर सध्याच्या हंगामात काही भागांमध्ये हेलीकोवरपा लार्वादेखील आढळतात. या पिकाच्या शेतीजवळील कालवा किवा अधिक पाणी लागणारी पिके जसे की, टोमॅटो, वांगी, भेंडी यांच्यामुळेदेखील माव्याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. हे पीक कोरडया हवामानात घेतले जात असल्यामुळे या भागात ही फुलकिड्यांचे प्रमाण लक्षात घेतले जाते. एकात्मिक कीड व्यवस्थापन - १. निरीक्षणासाठी हेक्टरी १० पिवळे चिकट सापळे स्थापित करा. २. मावा व फुलकिडेच्या प्राथमिक अवस्थेत नीम आधारित पावडर @५०० ग्रॅम (५%उतारा) नीम तेल ३० मिली अधिक १० ग्रॅम धुण्याची पावडर प्रति १० ली पाण्यामध्ये फवारणी करावी. ३. लेडीबर्ड बीटल, सीरफीड फ्लाय व क्रीसोपरला या परभक्षांची संख्या निर्दशनास आल्यास कीटकनाशक स्प्रे टाळा.
४. वातावरणामध्ये अधिक आर्द्रता असल्यास वर्टिसिलियम लैकानी, जैविक आधारित बुरशीनाशकाची @ ४० ग्रॅम प्रति १० ली पाण्यामध्ये फवारणी करावी. ५. माव्याच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यूएसएल @१० मिली किंवा क्विनाॅनलफॉस २५ ईसी @ २० मिली प्रति १० ली पाण्यामधून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. ६. फूलकिडेच्या नियंत्रणासाठी मिथाइल-ओ-डिमेटन २५ इसी @१० मिली किंवा एसेफट ७५ एसपी @ १० ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी @ २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
424
2
संबंधित लेख