सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळींब पिकामधील एकात्मिक कीड व्यवस्थापन
1) डाळींबाची छाटणी केलेल्या संपूर्ण झाडावर स्पर्शजन्य किडनाशकाची फवारणी करावी. क्लोरोपायरीफॉस ग्रॅम 20 मिली 10 लिटर पाण्यात खोडावर फवारणी करावी. झाडाच्या खोडांना मुलामा (4 कि. गेरू+50 ग्रॅम सी. ओ. सी.+क्लोरोपायरीफॉस 50 मिली+ स्टीकर 5 मिली/ 10 लि. पाण्यात द्यावा. २)छाटणीपूर्वी किंवा नंतर शेणखताबरोबर 20 ग्रॅम ट्रायकोडर्माप्लस +२ किलो चांगल्या प्रतीची निंबोळी पेंड/ झाडाभोवती दोन रिंगमध्ये मातीत मिसळून द्यावी. झेंडूची लागवड दोन झाडांमध्ये/ बागेच्या बाजूने करावी. 3) मेटॉरायझीयम अ‍ॅनोस्पेपॉली 60 ग्रॅम दूध/10 पाण्यात फवारणी करावी. किंवा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमेथोएट 15 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड17.8-मिली/10ली पाण्यात फवारावे. रिपनोसॅड 45 टक्के एस. सी. 2.5 ग्रॅम / 10 ली प्रादुर्भाव दिसल्यास पाण्यात फवारावे. 4)प्रादुर्भाव दिसल्यास आठवड्यानंतर 5% निंबोळी अर्क किंवा अ‍ॅझडिराक्टीन 20 मिली किंवा निमतेल व करंजतेल 30 मिली. 10 ली. पाण्यास फवारावे.
5)अ‍ॅझाडायरेक्टीन 20 मिली. 10 लिटर पाण्यात फुलावर फळांवर अंडी किंवा लहान फळांना छिद्रे दिसल्यास फवारणी करावी. किंवा 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. _x000D_ 6)मुलामा दिलेल्या झाडावर लहान छिद्रे वा भुसा पडत असल्यास निरीक्षणांती तारेने काढून त्यात इंजेक्शनच्या सहाय्याने 5 मिली सायपरमॅथ्रीन किंवा 10 मि.ली. छिद्रात सोडून मेणाने छिद्र बंद करावे._x000D_ 7)पांढर्‍या माशीच्या नियंत्रणाकरीता बिव्हेरीया/ व्हर्टिसिलीयझम 20 मिली 10 लि. पाण्यात फवारावे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
181
2
संबंधित लेख