आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीमधील एकात्मिक कीड व्यवस्थापन
• ऊन्हाळ्यात खोल नांगरट करावी.त्यामुळे बोंड अळीच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. शेताच्या जवळ पऱ्हाट्याचा ढीग लावू नये व ते जून महिन्यापूर्वी जाळून टाकाव्यात. • निंबोळी अर्क तयार करण्यासाठी, निंबोळ्या जमा करून वाळवून ठेवाव्यात. • पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी शेतीच्या बांधावर ,गाजरगवत, रानभेंडी, कडूजिरे,काळाधोतरा,या वनस्पती नष्ट कराव्यात. • कपाशीच्या शेतीभोवती ,मका ,झेंडू, एरंडी चवळीची लागवड करावी. • कपाशीमध्ये तुर, मुग, सोयाबीन यासारखे अंतरपीक घ्यावे, यामुळे बोंड अळीच्या शत्रूंची संख्या वाढण्यास मदत होते. • ट्रायकोग्रामा चिलोनीस या कीटकांची अंडी बोंड अळीची अंडी दिसू लागताच किंवा ४५ व ५५ व्या दिवशी या दोन वेळेस शेतात सोडावी. • व्हर्टिसिलींअम लिकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. • पक्षांना बसण्यासाठी शेतीमध्ये पक्षी थांबे लावावेत. • शेतीमध्ये एकरी ४ कामगंध सापळे लावावेत.व बोंडअळीचे पतंग मोजावेत. जेणेकरून किडींची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेता येईल. संदर्भ - अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
कापुसबद्दलचा सल्ला उपयुक्त वाटला, तर पिवळ्या रंगाचा अंगठा/लाईक दाबा.
253
0
संबंधित लेख