AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Jan 20, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा, लसूण पिकामध्ये एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
कांदा व लसूण पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी पिकातील रोग आणि किडींचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीकोनातून काही मुख्य हानिकारक कीड आणि रोग आहेत, ज्यामुळे पिकाचे अधिक नुकसान होते. ज्यांना नियंत्रित करणे आवश्यक आहे. चला तर मग, या लेखात आपण कांदा व लसूण पिकांमधील रोग आणि किडींच्या व्यवस्थापनाबद्दल जाणून घेऊया. प्रमुख किडी:- फुलकिडे (थ्रिप्स):- कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक पाने खरडून पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वळतात. व्यवस्थापन: या किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% एससी @४०० मिली प्रति एकर २०० पाण्यामध्ये मिळसून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. हुमणी कीड:- व्यवस्थापन:- • शेतीमध्ये कच्चे शेणखत वापरू नये. • हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी पिकांमधील प्रादुर्भावित रोपांच्या बुंध्याजवळ औषध ३-४ इंचापर्यंत खाली पोहोचेल, अशा पद्धतीने क्लोरोपायरायफॉस २०% ईसी @५००मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी. • कार्बोफ्युरॉन ३% सीजी १३ किलो प्रति एकर धुरळणी करावी. प्रमुख रोग:- जांभळा करपा (Purple blotch): पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्टयाचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. नियंत्रण:- मेटालॅक्झिल ४% + मॅन्कोझेब ६४% @४०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. करपा रोग:- या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पानांच्या वरच्या भागावर हलके नारंगी रंगाचे डाग पडतात. नियंत्रण:- मॅन्कोझेब ७५% डब्ल्यूपी @५०० ग्रॅम प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
608
4