AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Apr 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटोमध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक नियंत्रण
टोमॅटोच्या पिकामध्ये फळ पोखरणारी ही एक कीड आहे. यामुळे टोमॅटोच्या फळांचे सर्वात जास्त नुकसान होते. या किडीवर नियमितपणे रासायनिक कीटकनाशकांचा एकसारखा वापर करू नये. त्याऐवजी फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन करून किडींचे नियंत्रण करावे.
एकात्मिक व्यवस्थापन - • शेतीमध्ये प्रकाश सापळे स्थापित करावे. • टोमॅटोच्या शेतीभोवती आफ्रिकन झेंडूची रोपे लावावीत. • लार्वा एकत्रित गोळा करून नष्ट कराव्यात. • प्रति एकरी ५-६ कामगंध सापळे स्थापित करावे. • किडींच्या प्राथमिक अवस्थेत बिवेरिया बसियाना @ ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. • HaNPV @ २५० प्रति हेक्टरी फवारणी करावी. • जैविक कीटकनाशक आधारित बॅसिलस थरूनजेनेसिस @७५० ग्रॅम प्रति हेक्टरी फवारणी करावी. • प्रादुर्भाव ग्रस्त झालेली फळे गोळा करून नष्ट करावीत. • क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @ ३ मिली किंवा सायनट्रिनीलीप्रोल १०.२६ ओडी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
296
26