सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकांमधील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
१.हंगामानुसार एखाद्या भागात लागवड एकाच आठवड्यात पूर्ण करावी. २. दोन हंगामामध्ये बराच काळ अंतर राखून रोगकारक घटकांचा किंवा किडींचा जीवनक्रम तोडता येईल. ३. प्रमाणित बियाणे वापरावे. तसेच बीजप्रक्रिया अवश्य करावी. ४. पिकाची फेरपालट करावी.
५. पाण्याचा चांगला निचरा व्यवस्थित होणाऱ्या जमिनीतच कांदा लागवड करावी._x000D_ ६. रोपे नेहमी गादीवाफ्यांवर लावावीत._x000D_ ७.फवारणी करताना द्रावणामध्ये स्टिकरचा उपयोग करावा._x000D_ ८.किडी व रोग यांच्या नियंत्रणाकरिता एकमेंकांना पुरक अशा रसायनांची एकत्रित फवारणी करावी._x000D_ ९. एकच कीटकनाशक सतत वापरू नये. त्यामुळे किडींची प्रतिकार शक्ती वाढते ते टाळण्यासाठी वेगवेगळी कीटकनाशके आलटून-पालटून वापरावीत._x000D_ १०. बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याच्या रोपांमध्ये फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचा वापर करू नये._x000D_ संदर्भ –अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस २४ जानेवारी १९
821
0
संबंधित लेख