जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फ़ळातील रसशोषणा-या पतंगाचे एकात्मिक व्यवस्थापन
मोसंबी, संत्रा,डाळींब व द्राक्ष पिकांमध्ये फ़ळातील रस शोषन करणा-या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसुन येतो. दरवर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात ही किड प्रौढावस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. या फ़ळउत्पादक भागातील मृग बहरातील फ़ळांचे मोठे नुकसान या किडीकडुन होते.
एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन - १. बागेच्या आजुबाजुला बांधावर स्वच्छता राखावी. शेताच्या आजुबाजुला विशेषता इतर पिकांमधील अळीच्या वाढीला पूरक असणाऱ्या वनस्पतींचा जसे गुळवेल, वासनवेल, चांदवेल इत्यादि तणांचा नायनाट करावा २. फ़ळ परिपक्व होण्याच्या कालावधीमध्ये बागेत सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान कचरा-कडुनिंबाची पाने, जाळून धूर करावा. ३. पिकलेली केळी बागेत बांधुन त्याकडे पतंग आकर्षित होत असल्यास याचा वापर अमिष तयार करण्यासाठी करता येइल. विष अमिष तयार करण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाने वेगवेगळे प्रयोग करता येइल. केळी सारख्या फ़ळात डायक्लोरोवॉस सारखे किटकनाशक इंजेक्शन च्या सहाय्याने टाकुण पतंगाचे नियंत्रण करता येइल. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये फ़ळ काढनी हंगाम येत असेल तर वर्तमानपत्र,पॉलीमर पिशव्याचा वापर करुन द्राक्ष घड झाकुन घ्यावेत. या द्वारे पुर्णपणे नियंत्रण मिळू शकते. ४. या पतंगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर रात्री ७ ते ११ आणि पहाटे ५ ते ६ या वेळी बागेत टेंभा (मशाल) किंवा बॅटरीच्या साह्याने फळावर बसलेले पतंग गोळा करुन रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. बागेच्या आजुबाजुला पतंगांच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा देखील संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत वापर करता येइल. सध्या संत्रा,मोसंबी,डाळींबामध्ये हीच पध्दत सर्वात यशस्वी ठरत आहे. सोलर लाईट ट्रेप देखील फ़ायदेशीर दिसुन येत आहेत याचाही एकरी एक या प्रमाणात वापर रुन पतंग नियंत्रणात करता येवु शकतो. ५. विषारी आमिष बनवण्याकरता ९५ टक्के मळी किंवा गुळ काकवी आणि ५ टक्के मॅलॅथीऑन ५० ईसी वापरावे. ही आमिषे रात्रीच्या वेळी प्रकाश सापळ्यातील सीएफएल दिव्याखाली पसरट भांड्यामध्ये ठेवावीत. हे अमिष प्रादुर्भाव सुरु होण्याच्या अगोदर पासुन बागेच्या आजुबाजुला लावुन ठेवावे. ६. पतंगाना बागेपासून परावृत करण्याकरिता बाजारात काही उत्पादने उपलब्ध आहेत,ज्यात सिट्रोनेला ऑईल,निलगीरी तेल,फ़िश ऑइल यासारख्या उग्र स्वरुपाचा वास असणा-या पदार्थांचा समावेश करुन काही कंपन्याने उत्पादने बाजारात आणली आहेत. याचा वापर मोसंबी,संत्रा, डाळींबा मध्ये प्रचलीत असेल तरी या फ़वारणीचा वापर करताना रासायनिक अंश,डाग,विशीष्ट वास इत्यादी गोष्टींचा अभ्यास करुन तज्ञांच्या मार्गदर्शनाने वापर करावा. श्री.तुषार उगले, कीटकशास्त्रज्ञ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
62
1
संबंधित लेख