AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Sep 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकांतील पिठ्या ढेकूण किडीचे एकात्मिक व्यवस्थापन
पिठ्या ढेकूण (मिलीबग) या किडीचे मूळ भारतातील नसून, ते इतर देशातून प्रसारित झाले आहेत. २००६ रोजी गुजरातमध्ये एक उद्रेक झाला आणि त्यानंतर इतर राज्यांमध्ये ही कीड दिसून आली. प्रत्येक वर्षी कापसाच्या लागवडी वेळी ही कीड दिसून येते. त्याचबरोबर कीड कापूस पीक व्यतिरिक्त इतर पिकांवरही प्रादुर्भाव करते. आजकाल, मिलीबगची सुरूवात भारतातील कपाशीच्या पिकातून होत असताना दिसून येते. मेलीबग्स कापसाच्या रोपातील सर्व भागांवर प्रादुर्भाव करून, पिकातील रस शोषण करतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडांमध्ये विकृत, विखुरलेली, आकसलेली आणि गुच्छीदार पाने होत असून झाडाची वाढ खुंटते याप्रकारे ही लक्षणे दिसतात. त्याचबरोबर झाडे पिवळी पडून ती पूर्णपणे वाळतात तसेच पिकांच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. दीर्घ कालावधीसाठी पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पावसाळा संपल्यानंतर या किडींची संख्या वाढते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन: • प्रादुर्भावग्रस्त असणारी सर्व झाडे काढून नष्ट करावी. • प्रादुर्भावग्रस्त तणे काढून टाकल्यानंतर, पिकामध्ये न ठेवता किंवा पाण्यामध्ये न टाकता नष्ट करावीत. • शेतीमध्ये मुंग्यांचे वारूळ शोधून त्याच्या बिळामध्ये क्लोरपायरीफॉस २० ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. गरजेनुसार २-३ वेळा पुन्हा करू शकता. • कापूस पिकामध्ये शाखीय अवस्थेत मिलीबगच्या अधिक प्रादुर्भाव आढळून आल्यास रोपे काढून नष्ट करावीत. • कोणतेही उपकर पिकामध्ये वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवावे. • एनेसियस बंबावलाई हे मिलीबगचा एक महत्त्वपूर्ण परजीवी (४०-७०% परजीवी) आहे. जेव्हा हा परजीवी विपुल प्रमाणात आढळतो, तेव्हा विषारी कीटकनाशके टाळावेत. • शेतीमध्ये नियमितपणे देखरेख ठेवावी आणि रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. • किडींचा प्रसार सुरु होताच, निंबोळीचे तेल @४० मि.ली. किंवा कडुनिंब आधारित फॉर्म्युलेशन @ १० मिली (१% ईसी) @४० मिली (०.१५% ईसी) प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • जास्त आर्द्रता असणाऱ्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळी व्हर्टिसिलियम लेकॅनी, बुरशीजन्य पॅथॉजन @४० ग्रॅम किंवा मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • जर प्रादुर्भाव वाढत आहे, असे दिसल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी @ १० मि.ली. किंवा थायोडीकार्ब १० डब्ल्यूपी @१० ग्रॅम किंवा बुप्रोफेझिन २५ एससी @ २० मि.ली. किंवा क्लोरपायरीफॉस २० ईसी @ २० मिली प्रति १० लिटर पाणी तसेच या मिश्रणात डिटर्जंट पावडर @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • प्रत्येक फवारणीमध्ये कीटकनाशके बदला, पूर्ण झाडावर फवारणीचे औषध पडत आहे का तपासावे. • शेतीमध्ये मेंढरे, बकऱ्या व जनावरांना चरण्यासाठी सोडू नका. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
516
73