AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Sep 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
केंद्राने राज्य सरकारला दिल्या सूचना
नवी दिल्ली – कांदा व कडधान्याच्या वाढत्या किंमती नियंत्रित व दबावात ठेवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या बफर स्टॉकमधून त्या खरेदी करण्याची सूचना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक राज्यात किंमत स्थिरीकरण निधी तयार करण्यावरही त्यांनी भर दयावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. विज्ञान भवन येथे राज्यमंत्री, सचिव व अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक विभागाच्या पाचवी राष्ट्रीय सल्लागार बैठक घेतल्यानंतर मंत्री पासवान हे पत्रकारांशी बोलत होते. सर्व राज्ये आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (एनएफएसए) च्या अंर्तगत आली आहेत. जे २०१४ मध्ये केवळ ११ होती. या वस्तुस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला. तांदूळ साठवणूक योजनेत मोठया प्रमाणात राज्यांच्या सहभागाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्यांना अन्न सुरक्षा कायदयांतर्गत आवश्यकता नोंदविण्यास सांगितले. जेणेकरून हिवाळयास सुरूवात होण्यापूर्वी आवश्यक धान्य साठवून ठेवता येईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले. संदर्भ – अॅग्रोवन, ५ सप्टेंबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
64
0