कृषि वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ३० हजार!
मोदी सरकार 'यूनिवर्सल बेसिक इनकम ' (यूबीआई) या योजनेवर काम करत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात ३० हजार रूपये जमा केले जाणार आहे. शासन ही योजना शेतकरी, बेरोजगार व गरीबांसाठी आणणार आहे. केंद्र सरकार १६ जानेवारीला पुढच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या योजनेचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जे शेतकरी दुसऱ्यांच्या येथे शेतमजुराचे काम करतात असे शेतकरीदेखील युबीआईमध्ये सामील होऊ शकतात. या अंतर्गत गरीब शेतकरी व बेरोजगारांना प्रति महिने २५ हजार रूपये दिले जाईल. ही रक्कम वार्षिक आधारावर दिली जाऊ शकते. ही योजना लागू झाल्यानंतर राशन व एलपीजी सिलेंडरवर मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा मिळणार नाही.
यासाठी मोदी सरकारने ज्या दोन राज्यांचा अभ्यास केला आहे त्यामध्ये ओडिसा या राज्याचा मॉडेल सर्वात उत्तम आहे. ओडिसा राज्याच्या 'कालिया' मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना ५ पिकांच्या हंगामात २५ हजार रूपये दिले जाते. मोदी शासन शेतकऱ्यांना पिकांच्या हंगामानुसार वर्षातून एकदाच आर्थिक मदत देण्याचा विचार करत आहे. यूनिवर्सल बेसिक इनकम ही योजना नक्की काय आहे? या योजनेनुसार शासन देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम देणार आहे. यासाठी नागरिकांना आपली आर्थिक परिस्थिती दाखवण्याची आवश्यकता नाही. शासन या रक्कमला महागाईनुसार ठरविणार आहे. सोबत ही कोणी व्यक्ती योजनेचा फायदा घेऊन कमविण्याचा वेगळा मार्ग म्हणून निवडेल, तर शासन त्या शेतकऱ्याला कर लावेल. संदर्भ - कृषी जागरण, १४ जनवरी, २०१९
477
0
संबंधित लेख