AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Dec 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आंबा पिकातील मोहोर व्यवस्थापन
सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तसेच मावा तुडतुडे, मिजमाशी व भुरी, करपा यांसारख्या कीड व रोगांचा आंबा पिकात प्रादुर्भाव होऊन जास्त प्रमाणात मोहोर गळण्याची समस्या येते. यावर उपाययोजना म्हणून पहिली फवारणी क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपरमेथ्रीन ५ % ईसी @ २ मिली + कार्बेनडॅन्झिम १२ % + मॅंकोझेब ६३ % WP घटक असलेले बुरशीनाशक @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन करावी. व त्यानंतर परागीकरण वाढून फुलगळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दुसरी फवारणी चिलेटेड कॅल्शिअम @ ०.५ ग्रॅम, बोरॉन @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
139
12