AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Nov 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लिंबू आणि संत्रा पिकांमधील नागअळीचे नियंत्रण.
लहान नागअळ्या पानांच्या दोन बाह्य थरांच्या दरम्यान आणि आतील हरितद्रव्ये खातात. प्रादुर्भावग्रस्त पानावर नागमोडी आकाराचा पांढरे पट्टे दिसतात. प्रादुर्भावग्रस्त पानांमध्ये या अळ्याची प्रत्यक्ष हालचाल देखील पाहता येते. हे "सिट्रस कॅन्कर" या जिवाणूजन्य रोगाचे वहन देखील करते. पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास, इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
112
10