गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
विविध पिकातील लाल व पिवळा कोळी किडीचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण
 कोरडे हवामान हे कोळीच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे वातावरणात ६० टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असल्यास याचा प्रादुर्भाव जास्त होतो.  पावसाळा संपल्यानंतर लाल/पिवळा कोळी नियंत्रित ठेवणे अवघड जाते.  लक्षणे:  ही कीड नवीन पानांमधील व नवीन वाढणाऱ्या शेंड्यामधील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची पाने खालच्या बाजूने झुकून चुरगळली जातात व पानांना उलट्या होडीचा आकार येतो.  झाडाची व फळांची वाढ खुंटली जाते, फुलगळ होते व फळांच्या देठावर आणि पानांवर लालसर तपकिरी रंगाचे डाग पडतात व नंतर गळ होते.  लाल कोळी हे झाडावर जाळे तयार करते. त्यामुळे जोपर्यंत कोळीचे जाळे नष्ट होत नाही, तोपर्यंत लाल कोळी नियंत्रित होत नाही.  लाल कोळीचा प्रादुर्भाव होणारी पिके:  मिरची, वांगी, भेंडी, टोमॅटो, गुलाब, वेलवर्गीय पिके, कापूस, द्राक्षे, नारळ, डाळिंब, लिंबूवर्गीय फळपीक तसेच फुल व फळ पिकांमध्ये याचा प्रादुर्भाव होतो.
 नियंत्रण: _x000D_  यावर उपाययोजना म्हणून लाल कोळीसाठी कीटकनाशकाची फवारणी करताना जास्तीत जास्त पाण्याचा वापर करावा. जेणेकरून किडीचे जाळे धुवून निघेल व कीड नियंत्रित होईल. _x000D_ _x000D_  कोळी नियंत्रणासाठी वापरली रसायने: _x000D_  सल्फर ८० WP @ २ ग्रॅम प्रति लिटर, स्पायरोमेसीफेन २२.९ % एससी @ १ मिली प्रति लिटर, प्रॉपरगाईट ५७ % ईसी @ २ मिली प्रति लिटर यांसारख्या औषधांचा वापर करावा._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
16
0
संबंधित लेख