पशुपालनकिसान समाधान
जनावरे विण्यापूर्वीची लक्षणे
पशुपालकांनी जनावरांचे वागणे समजून घेणे आवश्यक आहे, यामध्ये जनावरांच्या विण्याची लक्षणे गंभीर आहेत. जेणेकरून ते सहजपणे ओळखून त्यावर इलाज करणे गरजेचे असते. जर जनावरे सामान्य स्थितीत नसतील, तर त्यांच्या लक्षणावरून ओळखता आले पाहिजे. जनावरे विण्यापूर्वी दोन लक्षणे दर्शवतात.
विण्यापूर्वीची लक्षणे:- • स्वच्छ काचेसारखा चिकट स्त्राव जनावरांच्या योनीतून स्त्रवतो आणि कासेचा आकार मोठा दिसतो. • गाभण जनावरे कळपापासून दूर राहतात. • जनावरे कमी प्रमाणात चारा खातात. • जनावरे अस्वस्थ होतात आणि पोटात लाथ मारतात किंवा भिंतीसारख्या वस्तूंना पोट घासतात. • पाठीचे स्नायू सैल होतात, ज्यामुळे शेपूट वाढलेले दिसते. विण्याची तारीख जाणून घ्या: • जनावरांमध्ये कृत्रिम रेतन केल्यास, ती तारखेची नोंद ठेवावी. • कृत्रिम रेतन केल्यानंतर जनावर पुन्हा माजावर नाही आले, तर त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करावी. • जर कृत्रिम रेतनानुसार जनावर गाभण असेल, तर रेतन केलेल्या तारखेपासून अंदाजे विण्याची तारीख काढता येते. गायचा गर्भधारण कालावधी २८०-२९० दिवस, तर म्हशीचा ३०५-३१८ दिवसांचा असतो. जनावर विण्याचे लक्षण:- • जनावर वितेवेळी प्रथम वासराचे पुढचे पाय व डोके बाहेर येते. • जनावर विण्यापूर्वी पाण्याची पिशवी बाहेर येते. • जर वासरू सामान्य स्थितीत असेल, तर ही पिशवी साधारण ३० मिनिटामध्ये फुटण्यापूर्वी वासरू जन्माला येते. • प्रथमच विणाऱ्या जनावरांमध्ये ही क्रिया साधारण ४ तासापर्यंत चालते. • जर प्रसूतीनंतर एका तासापेक्षा जास्त काळ झाला आणि पाण्याची पिशवी दिसत नसेल, तर त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्यावी. संदर्भ :- किसान समाधान जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
425
0
संबंधित लेख