AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Mar 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
जगात भारत देश केळी उत्पादनात अव्वल
यंदाच्या हंगामात केळी उत्पादनात भारत हा देश जगात अव्वल ठरणार आहे. सुमारे ३० दशलक्ष टन केळीचे उत्पादन साध्य होईल, अशी स्थिती आहे. जळगाव : यंदाच्या हंगामात केळी उत्पादनात भारत हा देश जगात अव्वल ठरणार आहे. सुमारे ३० दशलक्ष टन केळीचे उत्पादन साध्य होईल, अशी स्थिती आहे. जगातला क्रमांक तीनचा निर्यातदार असलेल्या फिलिपिन्स देशामध्ये केळीचे उत्पादन सुमारे २५ टक्‍क्‍यांनी घटण्याचा अंदाज असल्याने देशातील केळी निर्यातीला चालना मिळत आहे. कारण फिलिपिन्स देशात केळीची काढणी जून ते ऑक्‍टोबरमध्ये सुरू होते. तेथून आखाती देशांमध्ये केळीची मोठी निर्यात होते. पण सध्या तेथेही केळी नसल्याने केळीच्या आयातीसाठी भारताकडे आखाती मंडळी वळली असून, विविध संस्थांच्या, एजंटच्या माध्यमातून आखातात केळीची देशातून निर्यात सुरू आहे. परिणामी, केळीच्या दरात सुधारणा होऊन मागील तीन दिवसांत दर क्विंटलमागे ६० रुपयांनी वधारले आहेत. निर्यातीच्या केळीला १००० रुपयांवर दर क्विंटलमागे मिळत आहेत.
महाराष्ट्र राज्यात निर्यातक्षम केळी रावेर, यावल व मुक्ताईनगर (जि. जळगाव) आणि शहादा (जि. नंदुरबार) येथे सध्या उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर सध्या केळी काढणीचा हंगाम आंध्र प्रदेशात संपला आहे. मध्य प्रदेश व गुजरातमधील काढणी मे महिन्यात सुरू होईल. सध्या महाराष्ट्र राज्यातील केळीची काढणी जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक सुरू आहे. खानदेशातून प्रतिदिन दोन कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची निर्यात होत आहे. बहरीन, मस्कट, अबुधाबी, इराण, सौदी अरेबिया आदी आखाती राष्ट्रांमधून रोज सहा कंटेनर केळीची मागणी आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १६ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
168
0