AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्तासकाळ
भारतीय द्राक्षांना युरोपमध्ये पसंती
जर्मनीसह युरोपमध्ये भारतीय द्राक्षांची विक्री सुरळीत सुरू आहे. द्राक्षांच्या निर्यातीसाठी ग्रेपनेट प्रणाली यशस्वी झाली असून, यंदाच्या हंगामासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक अन् आंध्र प्रदेशातील द्राक्ष उत्पादकांनी ३३ हजार ५०५ बागांची ऑनलाईन नोंदणी केली आहे. जगाच्या बाजारपेठेत नेदरलॅंडमध्ये सर्वाधिक २४ हजार ३८२, जर्मनीमध्ये ४ हजार ४७९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.
मागील वर्षी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवडयापर्यंत ४४ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा आतापर्यंत ३६ हजार ४२९ टनांची निर्यात झाली आहे. त्यामध्ये नेदरलॅंड, जर्मनीप्रमाणेच इंग्लंडमध्ये ३ हजार ९५३, डेन्मार्कमध्ये ८६६ टन व फिनलॅंड, आयर्लंड, स्पेन, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, स्वीडन, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, नॉर्वे आदि देशांमध्ये झालेल्या निर्यातीचाही समावेश आहे. संदर्भ – सकाळ, २४ फेब्रुवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
74
0