कृषी वार्ताकृषी जागरण
भारतीय कॉफीच्या ‘या’ पाच जातींसाठी भौगोलिक संकेतांक
नवी दिल्ली: भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील उद्योग चालना आणि अंतर्गत व्यापार विभागाने भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भौगोलिक संकेतांक जाहीर केले आहेत.
(जि. कोडागू, कर्नाटक), वायनाड रोबस्टा (जि. वायनाड, केरळ) चिकमगळूर अरेबिका (जि. चिकमगळूर, कर्नाटक), अराकू व्हॅली अरेबिका (आंध्र व ओदिशाचा डोंगराळ भाग) आणि बाबाबुदनगिरीज अरेबिका (चिकमगळूर) या कॉफीच्या पाच जातींना भौगोलिक संकेतांक मिळाला आहे. भारतात बहुतांश करुन दक्षिणेकडच्या राज्यात कॉफीचे उत्पादन होते. सुमारे ४.५४ लाख हेक्टरवर ३.६६ लाख शेतकरी कॉफीचे उत्पादन घेतात. भौगोलिक संकेतांक प्रमाणपत्रामुळे ओळख आणि संरक्षण मिळते. यामुळे विशिष्ट भागात तयार होणाऱ्या विशिष्ट जातीच्या कॉफीच्या गुणवत्ता, राखण्याकरिता कॉफी उत्पादकांना गुंतवणूक करण्यात येईल. त्याचबरोबर कॉफी उत्पादकांना जास्तीत जास्त किंमत मिळण्याबरोबरच भारतीय कॉफीला जागतिक स्तरावर अधिक मान्यता मिळेल. संदर्भ – कृषी जागरण, ३० मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
20
0
संबंधित लेख