कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
अमेरिकेतील २९ उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याचा कालावधी पुन्हा वाढविला
भारताने अमेरिकेतून आयात करणाऱ्या बदाम, आक्रोड आणि डाळयांच्यासहित २९ उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून तो १६ मे केला आहे.
अर्थ मंत्रालयाने अधिसूचनात म्हटले आहे की, अमेरिकेकडून आयात केलेल्या विशेष उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याची तारीख २ मे वरून १६ मे २०१९ करण्यात आली आहे. भारताने जून २०१८ मध्ये हे शुल्क लावण्यावर निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय घेण्यात आल्यापासून बऱ्याच वेळा हा आयात शुल्क लागू करण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस आणि भारतचे वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या दरम्यान या व्यापार-संबंधित मुद्दयांवर ६ मे ला ही बैठक होणार आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ४ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
13
0
संबंधित लेख