कृषि वार्ताअॅग्रोवन
देशात हळद लागवडीत वाढ
सांगली: जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची हळद लागवड पूर्ण झाली आहे. देशात यंदा पोषक वातावरण असल्याने आतापर्यंत २ लाख ३८ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हळदीच्या क्षेत्रात ३.५५ टक्क्यांनी म्हणजेच ८ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली. केंद्राचे शास्त्रज्ञ सांगतात की, सध्या हळदीला पोषक वातावरण आहे. मध्यंतरी पावसाचा खंड पडला होता. पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे हळदीचे पीक चांगले बहरू लागले आहे. हळद पिकांची वाढ चांगली होऊ लागली आहे. सध्या रोगाचा प्रादुर्भाव कुठेही झाला नाही. हरियाना, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर, मध्य प्रदेश, अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यातदेखील हळदीच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. संदर्भ: अॅग्रोवन, २८ जुलै २०१९
32
0
संबंधित लेख