AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Nov 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
आयएआरआयने विकसित केले गव्हाचे सुधारित वाण!
भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयएआरआय) गव्हाच्या काही प्रगत जाती विकसित केल्या आहेत ज्या कमी कालावधीत जास्त उत्पादन देतात. एचडी ३०४३ या गव्हाचे उत्पादन प्रति हेक्टर सुमारे ६६ क्विंटल आहे. या गव्हाच्या वाणाची तांबेरा रोगाची रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्याची दर्शविली आहे. एचआय १५६३ या वाणाची देखील तांबेरा रोगाची रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्याची दर्शविले असून, या वाणांचे उत्पादन प्रति हेक्टरी ३८ क्विंटल आहे.
एचडी २९८७ हा गव्हाचा वाण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि तामिळनाडूच्या मैदानी प्रदेशात पेरणीसाठी योग्य आहे. पर्जन्यमान क्षेत्रात (पावसावर आधारित क्षेत्रात) हेक्टरी २.०-२.२ क्विंटल उत्पादन तर मर्यादित सिंचन असलेल्या क्षेत्रात ३-३.२ क्विंटल आहे. गव्हाचे वाण चपाती बनवण्यासाठी योग्य आहे. एचडी २९८५ हा गव्हाचा वाण, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि मैदानी प्रदेशात पेरणीसाठी योग्य आहे. गव्हाच्या या जातीचे उत्पादन ३.५ ते ४ क्विंटल प्रति हेक्टरी आहे. या वाणाचा एकूण पीक कालावधी १०५-११० दिवसांचा आहे. संदर्भ:- कृषी जागरण १८ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा
243
0