AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Nov 19, 06:30 PM
पशुपालनकृषी जागरण
जनावरांमध्ये दूध आणि दुधातील फॅटची टक्केवारी वाढविणे.
जनावरांच्या संगोपनाचा नफा दूध आणि दुधाच्या फॅटवर अवलंबून असतो. जनावरांमधील दुधाचे उत्पादन आणि फॅटची टक्केवारी गायीच्या अनुवांशिक गुणधर्मावर अवलंबून असते. परंतु पशुपालक जनावरांच्या क्षमतेनुसार त्यांच्याकडून दूध उत्पादन मिळवू शकतात. याचे प्रमुख कारण कुपोषण आहे.
मुख्य पोषक घटक :- • जनावरांना त्यांच्या आहारामध्ये फक्त एकाच प्रकारचा चारा न देता त्यामध्ये नियोजनबद्ध बदल करावा. • विविध हिरव्या चाऱ्यासोबत शेंगवर्गीय चारा मिसळून द्यावा. • जनावरांना हिरवा चारा बारीक कापून द्यावा जेणेकरून त्यांना खाण्यास योग्य होऊन चाऱ्याचा अपव्यय टाळता येतो. • सायंकाळी दूध काढणे झाल्यानंतर जनावरांना सुखा चारा देणे गरजेचे आहे. • अधिक दूध देणाऱ्या जनावरांना इतर जनावरांच्या तुलनेत चाऱ्याचे प्रमाण अधिक देणे आवश्यक आहे. • जनावरांना पिण्यास ताजे व स्वच्छ पाणी द्यावे. • पिण्याच्या पाण्यामधून थोडा चुना दिल्यास कॅल्शिअमची कमतरता भरून निघते. तसेच इतर समस्यांचे देखील निराकरण होते. • जनावरांना चाऱ्यासोबतच योग्य प्रमाणात खनिज मिश्रण द्यावे. • प्रति दिन ५० ग्रॅम खनिज मिश्रण देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ३० ग्रॅम मीठ देण्याची शिफारस केली जाते. • चारा टाकण्याची आणि दूध काढण्याची वेळ निश्चित असावी. • गोठा नेहमी स्वच्छ असावा. • जनावरांना कोणत्याही प्रकारच्या तणावाचा सामना नसावा अन्यथा दुधाचे उत्पादन आणि फॅटच्या टक्केवारीवर परिणाम होतो.
327
3