AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Jun 19, 06:00 PM
पशुपालनपशुसंदेश
भाग १) जनावरांमध्ये लसीकरणाचे महत्व
जनावरांच्या आरोग्याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण प्रतिवर्ष हजारो दुधारू जनावरांना आजार होतात. जसे की, घटसर्प, लाळखुरकत अन्त्राविषार, फऱ्या, आर.पी.पी संसर्ग झाल्यामुळे दगावले. या कारणामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. लसीकरणाचे महत्व – जनावरांचे लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने सुरूवातीलाच करून घ्यावे. जेणेकरून आपण जनावरापासून मनुष्यामध्ये पसरणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. लसीकरण हे वातावरणातील किंवा शरीरातील सूक्ष्मजीवांशी लढण्याची ताकत वाढवते.लसीकरण हे फक्त सशक्त जनावरांनाच करावे. आजारी जनावरांना लसीकरण करून नये. पशुपालकांनी लस तयार होण्याची तारीख व समाप्ती तारीख पाहूनच लसीकरण करुन घ्यावे. लसीकरण व बचाव कार्य – जनावरांना वेळेवर लसीकरण केल्यावर त्यांच्यामध्ये आजाराची लक्षण दिसून येत नाही तसेच जनावर सशक्त व सुदृढ राहते. लसीकरण करण्याचा अगोदर परजीवीनाशक जनावरांना औषध देताना पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. लसीकरण झाल्यावर जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आहारामध्ये खनिज मिश्रण कमीत कमी ४५ दिवसापर्यंत द्यावे. संदर्भ – पशुसंदेश
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
466
0