AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Jun 19, 06:00 PM
जैविक शेतीhttp://satavic.org
वेगवेगळ्या पीक पद्धतीचे महत्व
परंपरागत शेतकरी आतापर्यंत पीक रोटेशन, मल्टी-क्रॉपिंग, इंटर क्रॉपिंग आणि पॉलीकल्चरच्या पद्धतींचे पालन करतात. जेणेकरून ते पर्यावरणाद्वारा उपलब्ध असलेली माती, पाणी आणि प्रकाशसमेत उपलब्ध असलेल्या सर्व इनपुटचा अधिकतम वापर करू शकतात. केरळचे घरगुती बाग एक उत्कृष्ट उदाहरण आहे. पीक फेरपालट – पिकांची क्रमवारी म्हणजे प्रत्येक हंगामात शेतीमध्ये एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या पिकांची लागवड करणे तसेच दुसरे पीक हे पहिल्या पिकाचे जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्याच्या वाढीसाठी उपयोग करते. ज्यामुळे जमिनीमध्ये खतांचे स्थिरीकरण होते त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. उदा. कपाशी+गहू+भुईमुग मिश्र पीक पद्धत – एकाच शेतीमध्ये एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक पिकांची लागवड करणे म्हणजे मिश्र शेती होय. शेतकरी जवळपास एकाच वेळी १०-१५ पिकांची लागवड करू शकतो. उदा. टोमॅटो + कांदा + झेंडू ( झेंडू हे पीक टोमॅटो पिकावरील किडींना स्वता:कडे आकर्षित करते.) अंतरपीक पद्धत- मुख्य पिकांमध्ये इतर पिकांची लागवड करणे म्हणजे अंतरपिक पद्धत होय. उदा. नारळ + केळी + आले + औषधी व सुंगधी वनस्पती शेतीमध्ये जैव-विविधता सुनिश्चित करताना आंतर पिकांच्या स्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करावा. पॉलीकल्चर- वरील पद्धतीनुसार पिकांच्या जैवविविधतेचा वापर करून पिकांवरील किडींना नियंत्रित ठेवणे तसेच जमिनीची उत्पादकता वाढवणे. पिकांचे आच्छादन – आच्छादन असलेली पिके ही जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करतात त्यामुळे या पिकांना अतिरिक्त खतांची आवश्यकता नसते. त्याचबरोबर जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास व मातीची होणारी धूप रोखण्यास मदत करते. जनावरांना चार म्हणून देखील या पिकांचा उपयोग होतो. संदर्भ -- http://satavic.org
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
408
0