कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
आईआईटीच्या विद्यार्थ्यांनी शेतीसाठी बनविले ‘अॅग्रीकॉप्टर’
मद्रास येथील भारतीय टेक्नॉलॉजी संस्थेतील विद्यार्थ्यांनी शेतीमध्ये कीटकनाशकांवर होणारी फवारणी अधिक सोईस्कर व्हावी यासाठी एक ‘अॅग्रीकॉप्टर’ तयार केले आहे. या तंत्रज्ञानामध्ये इमेजिंग कॅमेराचा उपयोग करून पिकांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे कीटकनाशकाची फवारणी दहा पट वेगाने आणि माणसाद्वारा केली जाणारी फवारणी ही समान खर्चाद्वारे १०० टक्के अचूक प्रकारे केली जाऊ शकते. सेंटर फॉर इनोवेशन, आयआयटी मद्रासच्या तीन विद्यार्थ्यांनी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे लोकांच्या आरोग्यावर काहीही परिणाम होणार नाही हा विचार करूनच हे तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग कॅमेरा ‘अॅग्रीकॉप्टर’ मध्ये लावलेले अत्याधुनिक मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग कॅमेरा ‘अॅग्रीकॉप्टर’ ड्रोनला पिकांच्या आरोग्यावर आधारित शेतीला स्मार्ट बनविण्यास मदत करतात. त्याचबरोबर स्वचलित कीटकनाशक रीफिलिंग प्रणाली ही सुनिश्चित करतात. या तंत्रज्ञानाला बनविण्यासाठी लगभग ५.१ लाख रूपये इतका खर्च आला आहे. या तंत्रज्ञानाची क्षमता १५ लिटर कीटकनाशक इतकी आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २२ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
65
0
संबंधित लेख