AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Oct 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
इफकोने बिगर-यूरिया खताचे दर प्रति बॅग 50 रुपयांनी कमी केले
नवी दिल्ली - रासायनिक खतांचे उत्पादन करणाऱ्या ‘इफको’ या सहकारी संस्थेने डायअमोनियम फॉस्‍फेट(डीएपी) सहित अन्य बिगर-युरिया खतांची किंमत 50 रू. प्रति बॅग घट करण्याची घोषणा केली आहे. अवस्थी म्हणाले की, कच्चा माल आणि उत्पादित खतांच्या जागतिक किंमतीत घट झाल्यामुळे आम्ही बिगरयुरिया खतांच्या किंमती कमी केल्या आहेत. चालू महिन्यात रबी पिकांची पेरणी सुरू होईल, भाव कपातीचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
इफकोच्या डीएपीची नवीन किंमत आता प्रति 50 किलो बॅग 12,00 रुपये असेल, जी पूर्वी 1250 रुपये होती. एनपीके -10 कॉम्प्लेक्सची किंमत प्रति बॅग 1175 रुपये होईल, जी आधी 1225 रुपये होती. एनपीके -12 कॉम्प्लेक्सची किंमत प्रति बॅग 1,185 रुपयांवर येईल, जी आधी 1235 रुपये होती. एनपी कॉम्प्लेक्सची किरकोळ किंमत प्रति बॅग 50 रुपयांनी कमी करून 975 रुपये केली आहे. जीएसटीसह डीएपी आणि कॉम्प्लेक्स खतांच्या नवीन किरकोळ किंमती 11 ऑक्टोबर 2019 पासून अंमलात आल्या आहेत. पूर्वीच्या तुलनेत निम कोटेड युरियाची किरकोळ किंमत प्रति 45 किलो 266.50 रुपये असेल. त्याची किंमत सरकार नियंत्रित करते. संदर्भ – आउटलुक एग्रीकल्चर, 11 अक्टूबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
432
11