पशुपालनअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जनावरांसाठी योग्य गोठा
• जनावरांचा गोठा हा सहसा मानवी वस्तीपासून थोड्या अंतरावर असणे आवश्यक आहे. • जर गोठा जमीन आसपासच्या क्षेत्रापेक्षा किंचित उंच आणि सपाट असेल, तर आपोआप पावसाचे पाणी व जनावरांचे शेण, मूत्र सहज काढून टाकणे शक्य होईल. • गोठा स्वच्छ राहण्यासाठी पक्की फरशी किंवा कोबा करावा, कारण धुवून तो स्वच्छ ठेवता येईल. • जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था २४ तास राहील अशी करावी.
• विशेषतः गोठ्यामध्ये थेट सूर्यप्रकाश मिळेल अशी संरचना करणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाशामुळे गोठा जंतू विरहित राहतो. • गोठ्यात हवा खेळती राहणे आवश्यक आहे. • अति थंड आणि गरम वाऱ्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी, गोठ्याची दिशा उत्तर-दक्षिण असावी. • गोठा रस्त्याच्या बाजूला असावा. जेणेकरून जनावरांची उत्पादने नेणे व आणण्यास योग्य होईल. • शक्यतो, गोठ्याजवळ जंगली प्राणी असून नयेत. • वीजपुरवठा पुरेसा आणि नियमित असावा. • गोठ्याच्या पूर्वेकडे, पश्चिम दिशेला दाट झाडे लावावीत. जेणेकरून थंडी व उबदार थंडीमुळे जनावरांना आराम मिळेल. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
351
0
संबंधित लेख