AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 May 19, 06:00 PM
कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
हनी मिशन' पासून १० हजार लोकांना मिळाला रोजगार
नवी दिल्ली: खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) यांच्यावतीने 'हनी मिशन' अंतर्गत मागील दोन वर्षापेक्षा ही कमी कालावधीत शेतकरी व बेरोजगार तरुणांना मधमाशी पालनसाठी एक लाखापेक्षा ही अधिक पेटया दिल्या आहेत.
केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले की, देशात प्रथमच मधमाशी पालनसाठी १,०१,००० पेटया वितरीत करण्यात आल्या आहेत. रोजगारमध्ये १० हजार पेक्षा जास्त संधी निर्माण केल्या आहेत. मिशन अंतर्गत अद्याप जवळजवळ ४ कोटी रुपये किमतीचे २४६ टन मध काढले आहे. केव्हीआयसीने मधमाशी पालकांना त्या मधपेटीची तपासणी करणे, मध काढणे, मधमाशीचे आजार व त्यावर उपचार यावर प्रशिक्षण दिले जाते. या अंतर्गत मधमाशी पालन उद्योगासाठी लागणारे अनुदान दिले जाते. १० मतपेटयांचे युनीट सुरू करण्यासाठी ८० टक्के अनुदान व शेतकऱ्यांला २० टक्के खर्च करावा लागणार आहे. संदर्भ- द इकॉनॉमिक टाइम्स, ०७ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
35
0