कृषी वार्ताकृषी जागरण
आता, हिमाचल प्रदेशदेखील बनणार जैविक राज्य!
भारताच्या पूर्वोत्तर असलेले सिक्कीम राज्य हे देशातील पहिले जैविक राज्य आहे. आता, यापाठोपाठ सिक्किमच्या पाऊलावर पाऊल टाकत हिमाचल प्रदेशदेखील जैविक राज्य बनण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर या राज्याने २०२२ पर्यंत पूर्णपणे जैविक कृषी राज्य बनविण्याची ब्लू प्रिंटदेखील तयार केली आहे.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले की, राज्य सरकारने चालू वित्त वर्षाच्या दरम्यान जवळपास ५० हजार शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे धैर्य पूर्ण केले आहे. कृषी विभागाचे सचिव ओंकार शर्मा यांनी सांगितले की, या प्रदेशच्या शासनाने जैविक शेतीला राज्यात अधिक वेगवान पध्दतीने प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजनादेखील केल्या आहेत. हिमाचल प्रदेशच्या शासनाने कृषीसाठी या पद्धतीचा स्वीकार केल्यानंतर, शेतीसाठी २५ करोड रू. चा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. कृषी विभागाच्या प्रयत्नांने मागील वर्षी ५०० शेतकऱ्यांच्या लक्ष्यनुसार ३००० शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत आणले गेले आहे. यंदा ५० हजार शेतकऱ्यांचे लक्ष्य सहजरीत्या प्राप्तदेखील होतील. यासाठी या राज्यात आधिकाधिक प्रशिक्षण शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. संदर्भ: कृषी जागरण, २७ मे २०१९. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
25
0
संबंधित लेख