कृषि वार्ताअॅग्रोवन
उदयापासून पावसाची शक्यता
पुणे: राज्यात आठवडाभर पाऊस नव्हता. मात्र आता, मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्यास पोषक स्थिती आहे. राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आज कोकणात काही ठिकाणी मुसळदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण व घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी येत आहेत. मराठवाडा, विदर्भात पाऊस वाढणार असून, मराठवाडयातही पाऊस पडण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १७ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
174
0
संबंधित लेख