मान्सून समाचारसकाळ
राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे – मान्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या काही भागांत पावसाला पुन्हा सुरूवात झाली. कोकणात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडयातही काही भागांत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. कोकण घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडयातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबईसह पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्हयात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. संदर्भ – सकाळ, ४ सप्टेंबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
48
0
संबंधित लेख