कृषी वार्ताअॅग्रोवन
अतिवृष्टीमुळे देशात ६४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान - कृषीमंत्री
नवी दिल्ली – यंदा देशात मान्सूनचा व परतीच्या मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने देशात ६४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत दिली.
देशात मान्सूनच्या काळात अनेक भागांत जोरदार अतिवृष्टी झाली. विशेषकरून सप्टेंबर महिन्यात खरीप पिकांना मोठा फटका बसला. खरिपातील कडधान्य, तेलबिया, कापूस, ऊस आदि पिकांना फटका बसला. परिणामी, अनेक राज्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहितीदेखील कृषीमंत्री यांनी यावेळी दिली. _x000D_ _x000D_ कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान २७.४ लाख, कर्नाटक ९ लाख ३५ हजार, उत्तर प्रदेश ८ लाख ८८ हजार, मध्य प्रदेश ६ लाख ४ हजार, महाराष्ट्र ४ लाख १७ हजार, आसाम २ लाख १४ हजार, बिहार २ लाख ६१ हजार, पंजाब १ लाख ५१ हजार, ओडिसा १ लाख ४९ हजार व केरळमध्ये ३१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. _x000D_ संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २४ नोव्हेंबर २०१९_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
110
0
संबंधित लेख