मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात पावसाचे प्रमाण वाढेल
३ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडयावरील हवेचे दाब आणखी कमी होतील त्यामुळे या सर्व भागात जोराचा पाऊस होईल. ४ जुलै पावसाचे प्रमाण वाढेल. वारे पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने वाहतील. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट हा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडयात जाणवेल. पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. राज्यात हवामान ढगाळ राहील. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचे प्रमाण वाढेल. ५ जुलैपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण वाढेल. कृषी सल्ला: वाघ्या घेवडा, धने, मूग, उडिद व भुईमूग पिकाची लागवड फायदयाची ठरणार आहे. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
228
0
संबंधित लेख